कुळथाची पिठी
महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी कुळीथ पिकवला जातो. कुळथाच्या पिठाची भाकरी, मोड आलेल्या कुळथाची आमटी असे पदार्थ त्यापासून बनवले जातात पण सर्वात लोकप्रिय आहे ती म्हणजे कुळथाची पिठी. कोकणातील गावांमध्ये जेव्हा शेतीची कामे सुरू होतात तेव्हा जेवण बनवायला जास्त वेळ नसतो म्हणून मग अशावेळी अगदी झटपट बनवून तयार होणारी पिठी हा एक उत्तम उपाय असतो.
कुळथांमध्ये मोठ्या प्रमाणात लोह असल्यामुळे उच्च रक्तदान, मुळव्याध यकृताचे दोष तसेच लठ्ठपणा, मुतखडा आणि इतर बऱ्याच आजारांवरती कुळीथ गुणकारी ठरतात. स्त्रियांच्या मासिक स्त्रावाच्या दोषांवर कुळथाच्या बियांचा काढा गुणकारी ठरतो.
आता जरी बरेचसे शेतकरी जास्त उत्पन्न देणाऱ्या आणि बाजारात मागणी असणाऱ्या इतर कडधान्यांकडे वळत असले तरीही आमच्या कोकणातील काही शेतकरी अजूनही पारंपारिक पद्धतीने आणि काही अंशी नवीन प्रयोग करून कुळथाचे पीक घेत आहेत आणि अशा कडधान्यांना जिवंत ठेवत आहेत.
आम्ही गेली काही वर्षे अशाच शेतकऱ्यांकडून कोणतेही रासायनिक खत अथवा कीटकनाशके न वापरता पिकवलेले कुळीथ आणि असे अनेक पदार्थ घेऊन त्यापासून पिठी आणि तत्सम उत्पादने बनवण्याचा प्रयत्न करत आहोत. बऱ्याच ठिकाणी कुळथाची पिठी करताना त्यामध्ये मिरची हळद आणि इतर मसाले घालून त्याची चव बदलली जाते पण आम्ही कुळथाची पिठी जशीच्या तशी विकण्याचा प्रयत्न करत आहोत.
आमच्या घरात बनवल्या जाणाऱ्या कुळथाच्या पिठीची पाककृती खाली देत आहे. नक्की तयार करून पहा आणि आवडली तर नक्की शेअर करा.
साहित्य (२ माणसांकरिता)
कुळथाची पिठी - ४ चमचे
कांदा - १
लसूण - ५ पाकळ्या
कोथिंबीर
मिरची - ४
हळद
मीठ
कृती-
कुळथाच्या पिठीत पाणी घालून हे मिश्रण गुठळ्या होणार नाहीत अशा प्रकारे ढवळून एका बाजूला ठेवून द्या.
कढई किंवा इतर जाड भांड्यामध्ये तेल टाकून त्यात लसूण कांदा आणि मिरची बारीक चिरून टाका.
कांदा लालसर झाल्यावर त्यात हळद आणि चिमूटभर मीठ घाला आणि ढवळा.
आता यामध्ये ते बाजूला ठेवलेले मिश्रण ओतून ढवळत रहा. जसजशी पिठी शिजेल तसतसे पाणी कमी होत राहील आता एक मध्यम जाड कन्सिस्टन्सी मिळाल्यावर त्यावर वरून कोथिंबीर टाका आणि तुमची पिठी तयार होईल.
Info.
Horse gram known as Kulith or Hulaga in Marathi is a living known for it's rich nutrients and reputed medicinal properties. In our area we cook bhakri aur bread made using these legumes and curry with sprouted horse gram. But the most popular dish we made is Kulthachi Pithi.
In most of the rural homes while farming seasons we get very less time to cook a dinner. At that time this recipe which get ready in no time is a blessing.
Horse gram which is having high amount of iron is helpful in constipation, high blood sugar, loosing weight, kidney stones, improper liver functions and even in treating menstrual problems.
Most of the farmers nowadays focusing on high ending varieties of other grains but our Konkani farmer till date harvesting horse grams to keep it alive in nature.
We at vrundavan connecting this farmers and try to bring you an authentic gram flour and other such form products which are cultivated without using any chemical fertilizers and pesticides.
We are keeping it simple and not add any other supplementary I will making products as well.
Here we are sharing our Kulith Pithi recipe with you all. Try this at your home and let us know via Instagram and Facebook.
Thank you 😊
Ingredients (2 servings)
Kulith (horse gram) Pithi (flour)
Onion - 1
Green chilli - 4
Garlic - 5
Turmeric
Salt
Coriander
Recipe
For mix horse gram flour with water to get a water consistency and keep it aside.
Now take some oil in Kadhai put finely chopped garlic, chilli and onion into it to it.
When onion terms translucent add the mixture of horse gram flour and water to it. Stir continuously to avoid any lumps.
After few minutes as Pithi start cooking it will arrive at proper consistency now add specially chopped coriander and your kulith Pithi is ready to eat.
Tyr it and let me know via Instagram and Facebook @vrundavanmh07